Dattatray kadam
sakal
औसा - दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. २३) लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. औसा तालुक्यातील खरोसा येथे करपलेल्या पिकांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांना, ‘घाबरू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर काढून सरसकट मदत देऊ,’ अशी ग्वाही दिली.