औसा - हडोळती येथे वृद्ध शेतकरी दाम्पत्याने स्वतःला औताला जुंपून घेत शेती कसत असल्याची घटना ताजी असतांनाच औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील ७५ वर्षे वृद्ध शेतकरी दांपत्य गेल्या आठ ते दहा वर्षांपासून हातानेच कोळपे ओढून मशागत करीत असल्याचे समोर आले आहे. मुलीच्या लग्नासाठी आठ वर्षांपूर्वी विकलेली बैलजोडी परत घेता आली नाही.