Ausa Crime : औसा हादरले! मदत केल्याच्या कारणावरून भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह

औसा शहरातील जुन्या बसस्थानकासमोर भरदिवसा एका १९ वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता. २१) घडली.
Attack

Attack

sakal

Updated on: 

औसा - शहरातील जुन्या बसस्थानकासमोर भरदिवसा एका १९ वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता. २१) सकाळी घडली. तेजस राम गायकवाड (रा. संजयनगर, औसा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेने औसा शहर हादरले असून, वर्दळीच्या परिसरात दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने हल्ला होण्याच्या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com