Ausa Road Accident: दिवाळीसाठी गावी आले, पण काळाने घातला घाला; टाका पाटीजवळ अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू

Two Die in Car Bike Collision on Ausa Tuljapur Highway: औसा-तुळजापूर महामार्गावर काळाचा घाला; कारच्या धडकेत काका-पुतण्याचा जागीच मृत्यू
Two Killed in Car Bike Collision on Ausa Tuljapur Highway One Seriously Injured Near Taka Pati in Latur District

Two Killed in Car Bike Collision on Ausa Tuljapur Highway One Seriously Injured Near Taka Pati in Latur District

esakal

Updated on: 

-जलील पठाण

औसा : औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील टाका पाटीजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला भाचा गंभीर जखमी झाला. रविवारी (ता. १५) सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. तायप्पा दिगंबर बंडगर (वय ३८) आणि ओंकार गोपाळ बंडगर (वय २४) अशी मृतांची नावे आहेत. मारुती दंडे (वय २४) असे गंभीर जखमीचे नाव असून, त्याच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तावशी गावावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...