

Fatal car-bike collision near Taka Junction claims two lives.
esakal
औसा, : कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १५) सकाळी औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील टाका पाटीजवळ घडली. तायाप्पा दिगंबर बंडगर (वय ३८) आणि ओंकार गोपाळ बंडगर (वय २४) अशी मृतांची तर मारुती दंडे (वय २४) हा गंभीर जखमी झाला. जखमी मारुती हा ताय्यापाचा भाचा असल्याचे समजते. त्याच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.