पाणी येणार आणि पुन्हा जाणार, शेतजमिनीच्या सिंचनाचा प्रश्न जशास तसा राहणार

 Root dam
Root dam
Updated on

गंगाखेड (परभणी) : गंगाखेड तालुक्याचा बराचसा भाग हा गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे. गोदावरी नदीत पाणी साठवणूक करून शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी मुळी बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. परंतु, या ठिकाणी बसविण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे पुराच्या पावसात निखळून पडले. तब्बल चार वर्षांनंतरही स्वयंचलित दरवाजे बसवण्यात प्रशासनास मुहूर्त लागला नसल्यामुळे यावर्षीही आलेले पाणी वाहून गेले. याठिकाणी पाणी येणार व पुन्हा पाणी जाणार, यामुळे शेतजमिनीच्या सिंचनाचा प्रश्न जशासतसा राहणार अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून समोर येत आहे. 

गोदावरी नदीपात्रात मुळी या ठिकाणी २०१२ साली बंधारा बांधण्यात आला. याठिकाणी स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयोग प्रथमच करण्यात आला. परंतु २५ सप्टेंबर २०१६ साली गोदावरी नदीस आलेल्या पुरामध्ये याठिकाणी असलेले स्वयंचलित दरवाजे निखळून पडले. याबरोबरच दरवाजाच्या हायड्रॉलिक जॅक, रूटरमध्ये बिघाड झाला. यामुळे या ठिकाणी पाणी साठवणूक होण्याऐवजी पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला. 

शेतजमिनीच्या सिंचनाचा प्रश्न पुन्हा उभा... 

बंधाऱ्याच्या परिसरातील १७ हजार हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्याबरोबरच शहरास पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु, स्वयंचलित दरवाजाचा प्रयोग अयशस्वी झाला. या ठिकाणचे स्वयंचलित दरवाजे निखळून पडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी जन आंदोलनही छेडले होते. परंतु, या आंदोलनाची दखल आजपर्यंतही घेतली गेली नाही. पावसाळ्यापूर्वी मुळी बंधाऱ्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु, या बंधाऱ्यावरील दरवाजे बसवण्यास पाटबंधारे विभागास मुहूर्त मिळत नसल्यामुळे यावर्षीही गोदापात्रात आलेले पाणी पुन्हा निघून जाणार असल्यामुळे परिसरातील शेतजमिनीच्या सिंचनाचा प्रश्न पुन्हा उभा राहणार आहे. 

प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखल... 

गंगाखेडचे भूविकास उपविभागातील शाखा अभियंता एस.एस.हाके म्हणाले, उचल पद्धतीचे स्वयंचलित दरवाजे बसविण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखल करण्यात आले. त्यानुसार मार्च २०२० मध्ये १५.४० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून याठिकाणी लागणारे तीन डिझाईनपैकी दोन पार्ट उपलब्ध झाले असून एक पार्ट उपलब्ध होणे बाकी आहे. एक पार्ट उपलब्ध होताच तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर टेंडर काढण्यात येईल व कामास सुरुवात होईल. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com