esakal | लातुरात रिक्षावर झाड कोसळले अन् रिक्षाचालकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

लातूर : प्रकाशनगर भागात ज्ञानप्रकाश विद्यालयाच्यासमोर रिक्षावर पडलेले झाड अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने तोडून दूर केले. (छायाचित्र : विजय कवाळे, लातूर)

लातुरात रिक्षावर झाड कोसळले अन् रिक्षाचालकाचा मृत्यू

sakal_logo
By
हरि तुगावकर

लातूर : येथील प्रकाशनगर (Latur) भागात असलेल्या ज्ञानप्रकाश विद्यालयाच्या समोर झाड रिक्षावर पडल्याने रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.२२) घडली. शहरात गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाची (Rain) रिपरिप सुरु आहे. बुधवारी रात्री वारे, पाऊसही सुरुच होता. गुरुवारी सकाळीही अशीच रिपरिप सुरु होती. त्यात येथील प्रकाशनगर भागातील ज्ञानप्रकाश विद्यालयाच्या समोरून रिक्षा (एमएच २४ ए ३१६८) हा जात होता. त्यात दोन प्रवासीही होते. विद्यालयाच्या समोर हा रिक्षा येताच रस्त्यावरील मोठे झाड उन्मळून त्यावर पडले. यात रिक्षा चालक मारोती सिद्राम काळे यांचा मृत्यू झाला. इतर दोघे किरकोळ जखमी झाले. ही घटना घडताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.(autorikshaw driver died after falling tree on auto in latur glp 88)

हेही वाचा: PHOTOS: मराठवाड्यातील नद्यांना पूर; वाहतूक बंद, पिकांचे नुकसान

नागरिकांनी झाड हलवण्याचा प्रयत्न केला. पण ते मोठे असल्याने अनेक अडचणी आल्या. त्यानंतर महापालिकेच्या अग्नीशमन दलाला याची माहिती देण्यात आली. या दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने हे झाडे तोडून दूर केले. त्यानंतर रिक्षाचालक काळे यांना रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत काळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसास आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबक स्वामी, सचिव बंडूसिंग भाट, शहर उपाध्यक्ष गुणवंत खोडतोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

loading image