फिटनेसाठी नदीचा ‘नाद’ करणारा ‘अवलिया’

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 7 डिसेंबर 2019

0- व्यायाम मनस्वी आनंद देणारा असावा
0- हेल्थ कॉन्शस मेस ही संकल्पना आता जीन्समध्येही
0- खेळ व्यायाम म्हणून करावा
0-संस्कृती आणि वस्ती नदीच्या किनाऱ्याकिनाऱ्याने

नांदेड : आपले आरोग्य व मन तंदुरुस्त ठेवायचे असेल तर पोहणे हा असा एकमेव व्यायाम आहे. पोहण्यामुळे मन प्रसन्न तर होतेच उलट आपल्या दिवसाची सुरवात चांगली होते. व्यायाम, व्यायाम म्हणून केला तर तो कंटाळवाणा वाटतो. मात्र व्यायाम मनस्वी आनंद देणारा असावा असे मत गोदावरी नदीपात्रात नित्यनेमाने बाराही महिणे पोहणारे प्रा. मनोज बोरगावकर यांनी ‘सकाळ’ कडे व्यक्त केले. 

आपल्याकडे माणूस साठीला आला की त्याला पैलतीर दिसायला लागतो ...तो आवरासावरीची भाषा करायला लागतो पण...युरोप अमेरीकेमधे मात्र साठी आली की जगप्रवासाला निघायची तयारी केली जाते.हा बेसिक फरक...याचे कारणही हे की हेल्थ कॉन्शस मेस ही संकल्पना आता त्यांच्या जीन्स मधे रूजलीय. आपल्या आरोग्याची बेगमी ही फार पुर्वापासून अन् सातत्याने करावी लागते. 

व्यायाम आनंद देणारा असावा 

व्यायाम हा वर्कलोड नाही तर ते हेल्दी आयुष्य जगण्याचे वर्क आऊट आहे हे कळलेच नाही तर वळले पाहीजे. व्यायामाच्या बाबतीत आणखी एक निष्कर्ष सहज हाती लागला.... की व्यायाम, व्यायाम म्हणून केला की तो सिलँबसला असलेल्या अभ्यासक्रमासारखा नकोसा होतो. म्हणून व्यायाम अशाच प्रकारचा करावा की जो करतांना मनस्वी आनंद वाटावा. मग एखादा गेम (खेळ) खेळावा. आपल्या वयाला तब्येतीला साजेल असा. त्या खेळामधे ईंटरेस्ट असल्यामूळे आपण मग व्यायाम टाळायच्या एवजी त्या वेळेची वाट पाहतो. विवस्वान किंवा आवडलेला खेळ मग कोणताही असो. मैदानावर जिंकलेला एखादा पॉंईट दिवसभर साथसंगत करीत राहतो. खेळ व्यायाम म्हणून केला की... जगण्यातले हारजीतही स्पोर्टीव्हली घ्यायची सराईत सवय अंगवळणी पडते. 

नदीवर पोहण्याचा मनस्वी व्यायाम आवडतो

माझ्या बाबतीत बोलायचे तर मला नदीचा नाद आहे. अन् नाद करायला आपल्याला नदीपण आहे. 
म्हणूनच नदीवर पोहण्याचा मनस्वी व्यायाम मला खूप आवडतो. या पाठीमागे आणखीन एक ईमोशनल तर्क म्हणजे आईच्या गर्भातही आपण पाण्यातच डूंबत होतो... अन् नदीतही पाण्यात.... आपल्या मेंदूला पुन्हा आईच्या गर्भात गेल्याचा फील येत असेल अाणि मेंदू अन् शरीर रोज नव्याने ताजेतवाने होत असेल. 
म्हणून भल्या पहाटे मला नदीत पोहण्याचा व्यायाम मनस्वी आवडतो. मी तहेदील स्वताला नदीत झोकून देतो.... तीचे हे किनारे ते किनारे मन: पुत धुंडाळतही राहत. 

व्यायाम आवडणारा निवडावा

संस्कृती आणि वस्ती नदीच्या किनाऱ्याकिनाऱ्याने वसत गेली. हे भूगोलातलं वाक्य केव्हांतरी अभ्यास करतांना वाचलेलं तेंव्हा पाठ करावे लागले. पण नदीत पोहतांना तीचे किनारे धुंडाळतांना ठायीठायी याची प्रचिती येत गेली. सदरहून शरीरस्वास्थ हे आवश्यकच त्यासाठी करावा लागणारा व्यायाम जर आपण आपल्याला आवडणारा निवडला तर किती मजा येईल नाही? 
प्रा. मनोज बोरगावकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avalia, the sound of a river 'fitting'