Jalna Crop Damage:अवकाळी पावसाचा गहू, कांदा, मोसंबीवर मोठा फटका – शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

Impact of Untimely Rain and Hail in Jalna: जालना जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, मोसंबी आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले. शेतकरी गंभीर आर्थिक तडाख्यात आले आहेत.
Jalna Crop Damage

Jalna Crop Damage

esakal

Updated on

जालना: अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीनंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मात्र, प्राथमिक अहवाल देताना महसूल विभाग कृषी विभागावर अवलंबून राहिल्याने दोन्ही विभागांच्या प्राथमिक नुकसान अहवालामध्ये तफावत जाणवली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पंचनामे सुरू झाल्यानंतर बाधित क्षेत्र किती? हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या अहवालानुसार एक हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com