
बीड : मकरसंक्रांतीचा आनंद पतंग उडवून घेताना नायलॉन मांजाचा वापर होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन पक्षीमित्रांसह विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे. नायलॉन मांजामुळे पक्षी, नागरिक आणि पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेता यंदा नागरिकांनी साध्या दोऱ्याचा वापर करण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.