Dharshiv Road Work Issue: तीन वर्षांपासून रखडले आव्हाड-शिरपुरा-कोलेगाव रस्त्याचे काम

Kalamb Taluka Bad Road Issue: कळंब तालुक्यातील आव्हाड-शिरपुरा ते कोलेगाव या महत्त्वाच्या जिल्हा मार्गाचे डांबरीकरण काम तीन वर्षांपासून रखडले आहे. खराब रस्ता, खड्डे आणि पसरलेल्या खडीमुळे वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Dharshiv Road Work Delay

Dharshiv Road Work Delay

esakal

Updated on

शिराढोण: कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरातील सुमारे १५ गावांना जोडणारा आव्हाड-शिरपुरा ते कोलेगाव हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग गेल्या तीन वर्षांपासून डांबरीकरणाचे काम रखडल्याने नागरिक व वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. खराब रस्त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम राज्य शासनाकडून तीन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार कंत्राटदाराला कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण झाले नसून, रस्ता आजही दुरवस्थेत आहे. या रस्त्यावरील सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराच्या कामाचा ठेका कंत्राटदाराला देण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com