Eknath Shinde : शेतकऱ्याच्या मुलाला दिली संधी ; मुख्यमंत्री शिंदे,बाबूराव कदम कोहळीकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे. शिवसेना ही महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करणारी आहे. या शिवसेनेमध्ये कोणी मालक आणि नोकर नाही. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा म्हणून मी मुख्यमंत्री झालो.
Eknath Shinde
Eknath Shindesakal

हिंगोली : आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे. शिवसेना ही महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करणारी आहे. या शिवसेनेमध्ये कोणी मालक आणि नोकर नाही. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा म्हणून मी मुख्यमंत्री झालो. त्याच पद्धतीने बाबूराव कदम कोहळीकर यांच्या रूपाने शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारीची संधी दिली आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन केले. महात्मा गांधी चौकात झालेल्या सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. आमदार संतोष बांगर, तान्हाजी मुटकुळे, नामदेव ससाणे, भीमराव केराम, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते आदी यावेळी उपस्थित होते.

मागील निवडणुकीत मतदारांनी विश्वास दाखविला होता. पण, नंतर त्यांनी वेगळाच घरोबा केला. राज्यातील जनता हे कदापि सहन करू शकत नाही. बाळासाहेबांच्या विचारांसाठी उठाव केला, असे सांगून त्यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले. बाबूराव कोहळीकर हे मागच्या विधानसभा निवडणुकीत आमदार झाले असते. पण, त्यांना डावलले गेले. पैसे किती, किती खर्च करू शकतो, आमचे काय ,तुमचे काय असे सवाल त्यांना केले गेले. पण, त्यांनी त्यांचे कर्तृत्व दाखवले. त्यामुळे त्यांना मोठी संधी दिली आहे.

Eknath Shinde
Loksabha Election 2024 : लोकप्रतिनिधींच्या शिक्षणाचा मुद्दाही चर्चेत ; मतदारांची अपेक्षा

‘काम करेगा वही राजा बनेगा’

‘काम करेगा वही राजा बनेगा’. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांना पोटशूळ उठला. त्यांना उठता-बसता एकनाथ शिंदेच दिसतो. उद्या सामान्य शिवसैनिक मोठा झाला, कामाने मोठा झाला, मुख्यमंत्री म्हणून बोलायला लागला तर मला आनंद होईल, असे शिंदे म्हणाले.

आता आला बाबूराव…

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी देशात चारशे पार तर राज्यात पंचेचाळीस पार हा खासदारांचा आकडा गाठायचा आहे, असे सांगताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या नावाचा संदर्भ गाण्याशी जोडला. ‘आला बाबूराव... आता आला बाबूराव’ असे ते म्हणताच उपस्थितांनीही ठेका धरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com