raosaheb danve
sakal
बदनापूर - ‘साहेब, निसर्गाने धोका दिला हो... आम्ही होतं-नव्हतं सारं शेतात टाकलं, मात्र पाऊसच झाला नाही. आता सर्व काही संपलं. मायबाप सरकारने आम्हाला मदत करावी,’ अशी आर्त विनवणी करीत केळीगव्हाण येथील वयोवृद्ध शेतकरी रावसाहेब किसनराव मदन यांनी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर दुष्काळाची व्यथा मांडली. भावनांचा बांध फुटल्याने दानवेंच्या गळ्यात पडून धायमोकलून रडलेल्या या शेतकऱ्याचे दुःख पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.