Chandrashekhar Bawankule
sakal
बदनापूर - ‘साहेब, कष्टाने पिकवलेले पीक दुष्काळाने हिरावून नेले. आता साल कसे काढावे, लेकरांचे शिक्षण, आजारपणाचा खर्च आणि जनावरांसाठी चारा-पाणी कसे करावे,’ अशी व्यथा मांडत वरुडी (ता. बदनापूर) येथील शेतकऱ्यांनी हेक्टरी एक लाख रुपयांची भरीव मदत देण्याची मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. शेतकऱ्यांना दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी शासन आवश्यक उपाययोजना करीत असून, सरकार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही बावनकुळे यांनी शुक्रवारी (ता. दोन) दिली.