बदनापूर - येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वस्तीगृह आहे. या वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक तीनमध्ये बारावीत शिक्षण घेणाऱ्या भिल्ल समजाच्या मुलीने आपल्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा खळबळजनक प्रकार बुधवारी (ता. पाच) रात्री उशिरा घडला. दरम्यान, सुसाईड नोट न सापडल्याने त्या मुलीने आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, गुरुवारी (ता. सहा) दुपारी येथील ग्रामीण रुग्णालयात मृत विद्यार्थिनीच्या पार्थिवावर उत्तरीय तपासणी करण्यात आली.