

Fatal Collision: Badrinath Wagh Succumbs to Injuries After Truck-Bike Accident
Sakal
आडूळ/चित्ते पिंपळगाव : करमाड–दहेगाव राज्य महामार्गावरील बैबळावाडी शिवारातील गेवराई फाटा येथे ट्रक व मोटारसायकलच्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.