
वसमत : शेतीपुरक उद्योगाला उच्च शिक्षणाची जोड मिळाली की शेती अन् उद्योगातून होणाऱ्या नफा-तोटयाचा ताळेबंद जुळतो. शेतीला जोडधंद्याची साथ मिळाल्यास प्रगतीची दारे उघडतात आणि रोजगारही उपलब्ध करुन देता येऊ शकतो. वसमत तालुक्यातील खुदनापुर येथील औषध निर्माण शास्त्र (डी फार्मसी) उच्च शिक्षित असलेल्या बहिर्जी चव्हाण या २३ वर्षिय तरुणाने गुर्हाळाचा उद्योग उभा करुन वसमतच्या गुळाचा गोडवा महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेश मध्ये निर्माण केला.