
Latest Marathwada News: सरपंच यांना गाडीत टाकून नेले आणि खून केला घटना दुर्दैवी व प्रचंड वेदना देणारी आहे. पवनचक्की च्या खंडणी प्रकरणात झालेला खून व त्या मागे कुणाचा हात आहे हे शोधले पाहिजे, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. बीडचा बिहार करण्याचा प्रयत्न असून अशा पृवृत्तीला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.