Agriculture Technology : आता रोबोट तोडणार केळीचे घड! वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांना पेटंट

Robotic Arm Cuts and Safely Collects Banana Bunches : केळी उत्पादक शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि मनुष्यबळ वाचवण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एआय तंत्रज्ञानावर आधारित रोबोट विकसित केला आहे.
AI-powered robot developed to harvest ripe banana bunches safely.

AI-powered robot developed to harvest ripe banana bunches safely.

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर, : केळी उत्पादक शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि मनुष्यबळ वाचवण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली. केळीच्या झाडावरील पक्व घड अचूकपणे तोडून सुरक्षितरीत्या ट्रॅक्टरमध्ये ठेवणारा रोबोट विकसित करण्यात आला. केंद्र सरकारकडून या संशोधनाला पेटंटही मिळाले.

Loading content, please wait...