Banana Plantation : दुष्काळी मातीत फुलली केळीची बाग; मांडवा पठाणची केळी पोहोचली विदेशात!

दुष्काळ, पाणीटंचाई आणि आर्थिक अडचणींवर मात करत आधुनिक शेतीच्या माध्यमातून समृद्धी साधता येते, हे बीड जिल्ह्यातील मांडवा पठाण येथील शेतकऱ्यांनी दिले दाखवून.
Bananas from 36 farmers in Pathan Mandva have been exported abroad; these farmers from the village are now banana exporters.

Bananas from 36 farmers in Pathan Mandva have been exported abroad; these farmers from the village are now banana exporters.

sakal

Updated on: 

परळी वैजनाथ - दुष्काळ, पाणीटंचाई आणि आर्थिक अडचणींवर मात करत आधुनिक शेतीच्या माध्यमातून समृद्धी साधता येते, हे बीड जिल्ह्यातील मांडवा पठाण येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. ग्लोबल विकास ट्रस्टच्या सहकार्याने गावातील ३६ शेतकऱ्यांनी पारंपरिक कापूस आणि सोयाबीन शेतीला पर्याय म्हणून केळी लागवडीचा प्रयोग केला. आज त्यांच्या शेतातील केळी थेट विदेशात निर्यात होत असून, शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न मिळू लागले आहे.

Loading content, please wait...