गेवराई - गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात ड्रेसिंग टेबल भेट देऊन कन्यादान करण्याचा उपक्रम गेवराईतील बंगाली पिंपळ्यातील सरपंच यांनी दोन वर्षापासून सुरु केलेला आहे. आता पर्यंत ५० मुलींना ड्रेसिंग टेबल भेट दिला असून या त्यांच्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.