Jintur Agitation
sakal
जिंतूर - बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जिंतूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (ता. २१) अचानक हिंसक वळण लागले. मागील अनेक दिवसांपासून उपोषण करणारे आंदोलक विनोद आडे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली.
त्यानंतर संतप्त आंदोलकांनी अचानक रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. यावेळी आयशर ट्रक, ऑटो, आणि स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.