कोरोनामुळे नागरिक सतर्क, मात्र बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर

Coronavirus News, Ahmadpur
Coronavirus News, Ahmadpur

अहमदपूर (जि.लातूर) ः कोरोना या साथीच्या आजाराबाबत नागरिकांमध्ये जागृती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते सतर्क झाले आहेत. मात्र शहरात त्याचवेळी बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षितता मात्र वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. सध्या कोरोना या साथीच्या आजाराची नागरिकांनी धास्ती घेतलेली आहे. मात्र हा आजार होऊ नये यासाठी विविध माध्यमांतून  मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने, नागरिक प्रत्येक बाबतीत सावधानता बाळगताना दिसून येत आहेत. सद्यःस्थितीत अनेक ठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी झालेली आहे. बसस्थानकातही प्रवाशांची म्हणावी तशी गर्दी दिसून येत नाही. मात्र बसस्थानकावरील असणारे काही प्रवासी तसेच इतर नागरिकही मास्कचा वापर करताना दिसून येत आहेत.

याबरोबरच हँडवॉश व सॅनिटायझर्सना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे अनेक विक्रेत्यांचे म्हणणे आहे. याशिवाय सध्या नागरिक प्रवास टाळत असल्याने, खासगीरित्या प्रवासी  वाहतुक करणाऱ्या खासगी बसचे दरही मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. पुणे येथे जाण्यासाठी प्रवाशांची संख्या रोडावली असल्याने खासगी बस मालकांनी प्रतिव्यक्ती रूपये ५०० एवढा दर कमी केला आहे. जो की पूर्वी कमीत-कमी रूपये ८०० ते एक हजार प्रतिव्यक्ती आकारले जात होते. हॉटेल, स्वीटमार्ट याठिकाणीही पूर्वीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. ग्राहक कमी झाल्याने खाद्यपदार्थ हे ताजे व निम्म्यानेच तयार केले जात असल्याचे हॉटेलच्या व्यवस्थापकांनी स्पष्ट केले.   


शाळा व महाविद्यालाये हे विद्यार्थ्यांसाठी बंद केले असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात शांतता पसरली आहे. बहुतांश विद्यार्थी आपल्या गावी निघून गेल्याने वसतिगृहही रिकामे पडले आहेत. याशिवाय शासकीय कार्यालयातही कर्मचाऱ्यांसाठी ५०-५० चे सूत्र वापरल्या गेल्याने कांही प्रमाणात कोरोना या साथीचा आजारापासून सावधानता बाळगल्याचे दिसून येत आहे.  
या उलट मात्र राष्ट्रीयीकृत व खासगी बँकेतून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. बँक सुरू होण्याच्या आधीच बँकेसमोर ग्राहकांच्या  मोठ्या रांगा लागत आहेत. शिवाय बँकेतही दिवसभर ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. या अनुषंगाने काही बँकेतून कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर्स देण्यात आले आहेत. परंतू ग्राहकांच्या होत असेल्या गर्दीमुळे एकुणच बँकेतील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सद्यःस्थितीत वाऱ्यावरच असल्याचे दिसून येते आहे.      
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com