कोरोना इफेक्ट : बीडमध्ये बॅंकांतील गर्दी टाळण्याचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत सुट्या दिल्या असून, सध्या शेती व कार्यालयीन कामे थंडावली आहेत. त्याचा परिणाम बॅंकांवर होत असून कामे नसल्याने बॅंकेत येणाऱ्यांची संख्या वाढती आहे. 

माजलगाव (जि. बीड) - कोरोना विषाणूच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी शासन शर्थीचे प्रयत्न करत असून राष्ट्रीयीकृत बॅंकातही ग्राहकांनी गरज असेल तरच यावे, असे आवाहन बॅंकर्स असोसिएशनचे विभागीय उपाध्यक्ष सुरेश भानप यांनी केले आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील वाढत्या गर्दीतून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्या देण्यात आल्या आहेत. शेती, कार्यालयीन कामे थंडावली आहेत. त्याचा परिणाम बॅंकांवर होत असून कामे नसल्याने बॅंकेत येणाऱ्यांची संख्या वाढती आहे. या गर्दीतून कोरोनाला आमंत्रण मिळेल. आजाराची तीव्रता लक्षात घेऊन बॅंकेतील गर्दी कमी करावी, ऑॅनलाईन कामे करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन बॅंकर्स असोसिएशनचे विभागीय उपाध्यक्ष सुरेश भानप यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banks appeal to avoid crowds