esakal | ‘या’ शहरात शंकर साहित्य दरबाराची मेजवानी : कधी व कुठे, ते वाचलेच पाहिजे
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

साहित्य संस्कृती समाजात रुजविण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गत वर्षापासून शंकर साहित्य दरबार भरविला जातो. यंदाही हा दरबार भरत असून, भरगच्च मेजवानीचे आयोजन केल्याचे संयोजन समितीचे डॉ. जगदीश कदम यांनी सांगितले.  

‘या’ शहरात शंकर साहित्य दरबाराची मेजवानी : कधी व कुठे, ते वाचलेच पाहिजे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि कुसुम चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘शंकर साहित्य दरबार’ या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य दरबाराचे उद्‌घाटन ज्येष्ठ पत्रकार विचारवंत कुमार केतकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण असतील.  

साहित्य दरबारात भरगच्च कार्यक्रम
शंकर साहित्य दरबार या साहित्यविषयक उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. यंदा महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विख्यात कवयित्रीची मुलाखत आणि महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी अनुराधा पाटील आहेत.

हेही वाचासंगीत शंकर दरबारात दिग्गज कलावंतांची लागणार हजेरी

अनुराधा पाटील यांची प्रकट मुलाखत
यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ कवयित्री व साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या अनुराधा पाटील यांना अशोक चव्हाण यांना हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. अमिता चव्हाण, प्रसिद्ध कवी आमदार लहू कानडे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांची उपस्थिती यावेळी असेल. उद्‌घाटन सोहळ्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री अनुराधा पाटील यांची प्रकट मुलाखत डॉ. पी. विठ्ठल आणि सुचिता खल्लाळ हे घेणार आहेत.

यांचा आहे समावेश
दुपारी चार वाजता नागपूर येथील सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन भरत दौंडकर (पुणे) आणि श्रीनिवास मस्के (नांदेड) हे करणार असून कविसंमेलनात गोविंद कुलकर्णी (नांदेड), नारायण पुरी (बीड), अशोक थोरात (अमरावती), इंद्रजित घुले (मंगळवेढा), इरफान शेख (चंद्रपूर), योगिराज माने (लातूर), संजय बोरूडे (अहमदनगर), नितीन देशमुख (अकोला), शेषराव पिराजी धांडे (वाशिम), पुरूषोत्तम सदाफुले (पुणे), राजेंद्र वाघ (पुणे), सुरेश सावंत, शंकर वाडेवाले, देवीदास फुलारी, भगवान अंजनीकर, नागनाथ पाटील (नांदेड), संध्या रंगारी (बाळापूर), अनिल काळबांडे (उमरखेड), अमृत तेलंग, महेश मोरे, अशोक कुबडे, अनुराधा हवेलीकर, वसुंधरा सुत्रावे हे कवी सहभागी होणार आहेत.

हे देखील वाचायलाच हवे शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका- हभप ढोक महाराज

संमेलनाचा समारोप नांदेडचे माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ज्येष्ठ प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  -  डाॅ. जगदीश कदम, साहित्य शंकर दरबार संयोजन समिती

loading image