Farmer Agitation : बारामती ॲग्रोची गव्हाण बंद! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर व पहिली उचल ३९०० रुपये देण्याची मागणी

ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर आणि पहिली उचल ३९०० रुपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. १६) बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक दोनवर गव्हाण बंद आंदोलन करण्यात आले.
Farmer Agitation

Farmer Agitation

sakal

Updated on: 

कन्नड- ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर आणि पहिली उचल ३९०० रुपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. १६) बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक दोनवर गव्हाण बंद आंदोलन करण्यात आले. कारखाना प्रशासनाकडून चर्चेसाठी कोणीही अधिकारी न आल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी मुख्य प्रवेशद्वार ओलांडून थेट गव्हाणीपर्यंत धाव घेतली. सुरू असलेली गव्हाण बंद पाडून तेथेच ठिय्या आंदोलन केले.

Loading content, please wait...