Dharashiv News: गव्हाची वाढली आवक, पण ज्वारीने खाल्ला भाव; घटलेल्या क्षेत्रामुळे ज्वारीला झळाळी; हरभरा, गव्हाचे दर मात्र स्थिर

Wheat Supply Increases in Barshi Market: बार्शी बाजार समितीत गव्हाची आवक वाढली, पण ज्वारीला उच्च दर मिळत आहेत. हरभरा व गव्हाचे दर स्थिर राहण्याचा अंदाज.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह सीमेवरील मोठ्या बार्शी बाजार समितीत सध्या रब्बी हंगामातील पिकांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. गहू, हरभरा आणि ज्वारी या पिकांनी बाजारपेठा गजबजल्या आहेत.

मात्र, यंदाच्या हंगामात गव्हाच्या तुलनेत ज्वारीने बाजी मारली असून, ज्वारीला मिळणारा भाव शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. दुसरीकडे काढणी आणि मळणीसाठी सोयीस्कर असल्याने शेतकऱ्यांनी हरभरा व गव्हाला पसंती दिली असली, तरी ज्वारीच्या घटलेल्या क्षेत्रामुळे तिच्या दरात सुधारणा पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com