लाॅकडाऊन मध्ये शिवभोजन थाळीचा आधार

Shivbhojan.jpg
Shivbhojan.jpg
Updated on

नांदेड : स्वस्त दरात गरजूंना भोजन मिळावं यासाठी दहा रुपयांत 'शिवभोजन' योजनेचा शुभारंभ ता. २६ जानेवारी रोजी राज्यात झाला. तो याच वेळी जिल्ह्यात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ झाला, तो कृषी उत्पन बाजार समीती नवा मोंढा परिसरात. या ठिकाणी गरजूना जेवन मिळत असलेले पाहून नांदेडमधील ज्येष्ट छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी व्यक्त केलेला अनुभव

गरजू ग्राहकांना सोय
जिल्हाधिकारी कार्यालयातून कोरोना सबंधी बैठकीचे छायाचित्रे काढुन परत येताना बाजार समिती समोरच्या शिवभोजन थाळी केंद्राकडे लक्ष गेले. मग संचारबंदीत अडवू नये म्हनुन गळ्यात तर कॅमरा होताच सचारंबदी सुरू असताना सुरू असलेल्या नवा मोंढा परिसरात अत्यावश्यक सेवा पुरविणारे अन्नधान्य दुकाने, एसबीआय बॅकेत ग्राहक सेवा केंद्रात पैसे काढण्यासाठी आलेले गरजु ग्राहक येथे रोज आधारकार्ड दाखवुन शिवभोजन थाळीचा लाभ घेणारे लाभधारक चार दिवसापासुन सुरू असलेल्या लाॅकडाउन बंदमुळे रोजच्या सारखे नव्हते. मात्र किराणा दुकानात खरेदीसाठी आलेले काही कामगार दिसुन आले. 

गरजूंना उशीरापर्यंत मिळते जेवण
शिवभोजन देणाऱ्या देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी सागींतले की रोजच्या सारखा स्वंयपाक केला. पण फक्त तीस-पस्तीस जणच येवुन जेवण करून गेले तरी उशीरा गरजुना जेवन देतो. आज बंदमुळे अनेक गरजुना पैसे नसल्याने मोफतही जेवन दिले. वरणभात, भाजी पोळीचे जेवन घेताना लाभधारकाच्या चेहरऱ्यावर समाधान टीपता आले. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणानार्थ सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीचा उद्देश साध्य झाल्याचे वाटले. 

जेवण मिळाल्याने झाले समाधान
यावेळी बसलेला एक लाभधारक म्हनाला बॅंकेत पैसे काढन्यासाठी आलो. भुक लागली सर्व ठिकानचे हाॅटेल, खानावळी बंद आहेत. येथे मात्र जेवण मिळेल, असे वाटले आणि ते मिळाले. आज सायंकाळच्या आवाहानात तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा शिवभोजन थाळीची वेळ वाढवुन अकरा ते तीन करण्यात आली असताना आता तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच रुपयांत शिवभोजन थाळी मिळनार आहे.

बंद काळातही जेवणाची सुविधा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर  कामगार नवा मोंढा परीसरात अत्यावश्यक सेवा देनारे कर्मचारी यांनाही येथे या परिस्थितीत जेवन मिळत आहे. हे पाहुन खरच बंदमध्येही गरजुची सोय होत असल्याचे दिसुन आले.

विजय होकर्णे, ज्येष्ट छायाचित्रकार, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers Launch Water Protest In Kaygaon As Road Remains Encroached One Year After Written Assurance From Authorities
Unknown Young Man Found Dead In Godavari River Near Kaygaon Body Kept At Gangapur Hospital For Identification
Parbhani SIR
Shirur Kasar Loan Waiver
Marathi News Esakal
www.esakal.com