डाक विभागाच्या सेवेचा ‘आधार’

 डाक विभागाच्या सेवेचा ‘आधार’

परभणी : भारतीय डाक विभागाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आधार नोंदणी केंद्रास प्रतिसाद मिळत असून परभणी विभागाअंतर्गत वर्षभरात १४ हजार लाभार्थींनी या सेवेचा लाभ घेतला आहे. परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात डाक आधार केंद्र आहेत. यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे.

शासनाने सर्व व्यवहारासाठी आधार ओळख सक्तीची केल्याने काही वर्षापूर्वी आधार नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर शासनाने आधार नोंदणीसाठी आपले सेवा सरकार केंद्र आणि काही ठरावीक बॅंकात सोय उपलब्ध करुन दिली, मात्र पुन्हा आपले सेवा केंद्रावरुन आधार सेवा मर्यादीत करण्यात आली. सध्या काही ठरावीकच केंद्रावर आधारची नोंदणी, दुरुस्ती सुरु आहे. त्यामुळे नविन नोंदणीसह दुरुस्तीसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने भारतीय डाक विभागाच्या मदतीने आधार सेवा सुरु केली. ता. एक एप्रील २०१८ रोजी या सेवेला सुरुवात झाली.

अन्य केंद्रात चांगला प्रतिसाद
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डाक विभागाचे महत्व कमी होऊ लागल्याने शासनाने विविध उपक्रम सुरु केले. त्यामध्ये सुकन्या योजना, डाक विमा योजना, पेमेंट बॅंक आदींच्या माध्यमातून डाक विभागाला नवे रुप देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून डाक विभागाने सर्व जिल्ह्यात आणि तालुकास्तरावर डाक आधार सेवा केंद्र सुरु केले आले आहेत. परभणी डाक विभागात परभणीसह हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील परतुर तालुका येतो. या विभागात एकुण १४ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. सुरुवातीला काही तांत्रीक अडचणीमुळे वसमत, गंगाखेड, औंढा येथील केंद्रात सेवा उशीरा सुरु झाली. त्यामुळे तेथे प्रतिसाद कमी मिळाला. मात्र अन्य केंद्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

डाक विभागात नोंदणी
परभणी विभागातील १४ केंद्रात आतापर्यंत १४ हजार ७२० जणांनी लाभ घेतला आहे. डाक विभागात आधारची नवीन नोंदणी पूर्णपणे मोफत असून केवळ दुरुस्तीसाठी नाममात्र शुल्क घेतले जात आहे. मुळ कागदपत्रासह कार्यालयीन वेळेत डाक विभागात नोंदणी करता येत आहे.

विमा योजनेत वर्षभरात १२ कोटी जमा
डाक विभागाच्या डाक जिवन विमा योजना (पीएलआय)आणि ग्रामीण डाक जिवन योजनेला (आरपीएलआय) चांगला प्रतिसाद मिळत आहे.ता.एक एप्रील २०१९ ते ता.२९ फेब्रुवारी २०२० दरम्याण पीएलआय योजनेत ३८४ नवीन खाते सुरु झाले असून त्यासाठी प्रिमीयम म्हणून १२ कोटी ३८६ रुपये तर आरपीएलआय मध्ये ८६२ खाते सुरु होऊन २ कोटी ६३ हजार रुपयाचा प्रिमीयम जमा झाला आहे.आतापर्यंत मागील २० वर्षात पीएलआयचे ८ हजार ९६७ आणि आरपीएलआयचे ३२ हजार ७५० खातेदार झाले आहेत.

हेही वाचा - परभणीत आखुड बोटांचा सर्पगरुड !

केंद्रनिहाय लाभार्थी संख्या
परभणी ४, ३९५, हिंगोली ५,२२८, परतूर ७७९, वसमत ४९, सेलू १, ०५९, जिंतूर ८६, गंगाखेड ६७, औंढा ५६, मानवत ११४, पाथरी ८४०, पूर्णा २३६, कळमनुरी ६२५, कृषी विद्यापीठ ६१४, सेनगाव ४६५



गैरसोय टाळण्यासाठी सेवा 
आधार सर्वत्र सक्तीचे केल्याने प्रत्येकाला आधार ओळख पत्राची गरज भासत आहे. त्यामुळे आधार नोंदणीसाठी बाहेर होणारी गैरसोय टाळण्यासाठी डाक विभागाने आधार सेवा सुरु केली आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे.
एस. एम. अली, अधीक्षक, परभणी डाक विभाग
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com