
वसमत : वसमत तालुक्यातील चंदगव्हाण येथे'उसने दिलेले एक हजार रुपये मागितल्याच्या कारणावरून एकास चाकुने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमीला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असून या प्रकरणी बुधवारी ता. ९ पहाटे एका तरुणा विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वसमत तालुक्यातील चंदगव्हाण येथील शेख इर्शाद शेख दाऊद यांनी वसमत येथील दर्गा मोहल्ला भागातील शेख आसीम यास एक हजार रुपये उसने दिले होते.