चोरीच्या संशयातून चौघांना चोप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

धारूर तालुक्‍यातील मोहखेड येथे चाेरीच्या संशयावरून ग्रामस्थांनी मारहाण करून चार जणांना पाेलिसांच्या हवाली केले.

बीड - धारूर तालुक्‍यातील मोहखेड व परिसरात चोरीच्या घटना घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. त्यात रविवारी (ता. आठ) गावात चार अनोळखी व्यक्ती आढळल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना चांगला चोप देत सिरसाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. 

मोहखेड परिसरात पाच दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. यामध्ये घरफोडी, पशुधन चोरीसह इतर गुन्ह्यांच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी सकाळी हरियाना येथून गावात चारजण आले.

ग्रामस्थांनी चोर समजून त्यांना चांगलाच चोप दिला. यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्या चारही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांची नावे मोहम्मद जुनेद, सलीम खान, शेख ताहेर, नेहाज आल्वी (सर्व रा. हरियाना) असल्याचे उघड झाले असून आता पुढील तपास सिरसाळा पोलिस करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating up on suspicion of theft