Beed : २०व्या शतकातील संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी मंदिरी भाविकांची अखंड मांदियाळी अन् अन्नछत्र

Mauli Temple
Mauli Temple

श्रीक्षेत्र चाकरवाडी (ता. बीड) : एखाद्या धार्मिक पोथी - पुराणात, रामायण किंवा महाभारतात उल्लेख असलेल्या तीर्थस्थळाला मोठे महत्त्व असते. संत - महंतांच्या पावनस्पर्शाने, वास्तव्याने आणि जन्माने पुनीत झालेल्या स्थळांनाही आध्यात्मिक महत्त्व असते. असेच तीर्थस्थळ आहे बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र चाकरवाडी. २० व्या शतकातील संत ज्ञानेश्वर माउली महाराज यांच्या पादस्पर्शाने आणि वास्तव्याने लौकिक प्राप्त झालेले.

Mauli Temple
Mumbai : महारेरामुळे नागरिकांच्या फसवणुकीच्या तक्रारीतही घट; फडणवीसांची माहिती

१९९० च्या अगोदर जिल्ह्यातील एक खेडेगाव आणि आता राज्यभरातून भाविकांची वर्दळ असलेले हे तीर्थक्षेत्र. जिथे बारमाही भाविकांची मांदियाळी आणि बाराही महिने व २४ तास अखंड अन्नछत्र सुरु आहे.

ज्ञानेश्वर भीमाशंकर गिरी ऊर्फ माउली महाराज यांचे जन्मगाव आणि कर्मभूमीही केज तालुक्यातील श्रीक्षेत्र उत्रेश्वर पिंप्री. कीर्तनकार माउली महाराजांनी दिलेल्या दृष्टांतामुळे अनेकांच्या आयुष्याचे सोने झाले. त्यांच्यातील साक्षात्काराच्या दर्शनामुळे माउली महाराज सत्पुरुष असल्याचेही अनेकांनी आयुष्यात पाहिले. १९८५ ते १९९० च्या दरम्यान त्यांची कीर्ती सर्वत्र पसरत होती.

दरम्यान, काही कारणांनी १९९० मध्ये ते श्रीक्षेत्र चाकरवाडीत आले. अहमदनगर - अहमदपूर महामार्गावर येळंबघाटपासून साधारण तीन - साडेतीन किलोमीटर अंतरावरील या गावात बाळनाथ महाराजांचे समाधी मंदिर आहे. चाकरवाडीला आल्यानंतर माउली महाराजांनी याच ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी त्यांनी आपले पुत्र महादेव महाराज यांना बाळनाथ महाराजांच्या गादीवर बसवले. तेव्हापासून श्रीक्षेत्र चाकरवाडीच्या आध्यात्मिक कीर्तीलाही राज्यभर बहर आला.

माउली महाराजांनी तेव्हापासूनच या ठिकाणी अखंड अन्नदानास सुरुवात केली. साधारण २४ वर्षे लोटत असून एक दिवसही येथील अन्नछत्र बंद नाही. दरम्यान, १६ जून २००० ला ज्ञानेश्वर माउली यांचे देहावसान झाले. लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांचा समाधी सोहळा पार पडला. आता या ठिकाणी महादेव महाराज यांच्या पुढाकाराने माउली महाराजांचे भव्य समाधी मंदिरही उभारले आहे.

याच मंदिर परिसरात माउली महाराजांच्या पत्नी भागीरथीबाई गिरी यांचे समाधी मंदिर आणि हनुमान मंदिरही उभारले आहे. विशेष म्हणजे, समाधी मंदिरे आकर्षक, भव्य स्वरूपाची असून परिसरात एक लाख भाविक बसतील एवढ्या क्षमतेचे कीर्तन व महाप्रसादांसाठी सभागृहेही आहेत.

Mauli Temple
"दादांनी माझ्या कार्यकाळाचे महिने मोजले, पण..."; शरद पवारांसमोर अजितदादा-जयंत पाटलांची जुगलबंदी

वर्षात तीन हरिनाम सप्ताह; बारमाही भाविक

श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे श्रावण महिन्यात बाळनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त हरिनाम सप्ताह असतो. तर, माउली महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त देखील भव्य सप्ताह असतो. भागीरथीबाई गिरी यांच्या पुण्यतिथीचा देखील सप्ताह आयोजित केला जातो. सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची कीर्तने, संगीत भजन असे अनेक आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम असतात.

सप्ताहांमध्ये लाखो भाविकांची उपस्थिती असते. शिवाय अन्नदान केले जाते. यासह महाशिवरात्रोत्सव देखील भव्य स्वरूपात साजरा होतो. अमावास्या, एकादशी, श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते. विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी किमान पाच हजार भाविकांची दिवस - रात्र ये-जा असते. सर्व भाविकांना या ठिकाणी अन्नदान केले जाते.

राज्यभरातून आणि परराज्यातून देखील भाविक दर्शनासाठी येतात. हरिनाम सप्ताह, महाशिवरात्रोत्सवासह अमावास्या आदी आध्यात्मिक महत्त्व असलेल्या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. भाविकांच्या श्रद्धेतून आणि योगदानातूनच मंदिरांची उभारणी झाली असून अन्नछत्रही अखंडपणे चालत आहे.

- महादेव महाराज, श्रीक्षेत्र चाकरवाडी, ता. बीड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com