
बीड : आषाढी एकादशीनिमित्त बीड जिल्हामार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या विविध पालखी सोहळे, दिंड्यांतील वारकऱ्यांची काळजी घेण्याचे नियोजन यंदा प्रशासनही करणार आहे. वारकऱ्यांना पाणी, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी पोलिस बंदोबस्ताचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात तयारीची बैठक झाली.