

Tiger Attack in Beed
eSakal
आष्टी (जि. बीड): तालुक्यातील देवळाली (लोखंडी) शिवारातील सोनी पठार भागात शनिवारी सकाळी वाघाने केलेल्या भीषण हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक तपासात बिबट्या की वाघ, असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, हा हल्ला वाघानेच केल्याची पुष्टी वन विभागाने केली. देविदास माणिक टकले (वय ४०, रा. देवळाली परिसर, ता. आष्टी) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे देवळाली, लोखंडवाडीसह संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.