

Beed
esakal
बीड: रस्त्यावरून चालताना पाठीमागून येणारा एखादा कर्कश हॉर्न... काळजाचा थरकाप उडवणारा वेग... आणि अगदी स्कुटीला घासून जाणारी मुजोर रिक्षा ! हा बीड शहरातील कोणत्याही मुख्य रस्त्यावरील दैनंदिन थरार आहे. आज बीडकरांना रस्त्यावरून चालताना किंवा वाहन चालवताना स्वतःचा जीव मुठीत धरावा लागत आहे. शहरात सध्या आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.