
Beed Latest News: बीडच्या अंबाजोगाई येथे असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला होता. जन्म घेतलेल्या बाळाला मृत घोषित केल्यानंतर ते बाळ जिवंत निघालं. नेमकं अंत्यसंस्कारावेळी बाळ रडल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. या प्रकरणी आता अंतर्गत चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिष्ठाता धपाटे यांनी दिली.