बीड: बीड शहरातील बार्शी रोड आता मृत्यूचा सापळा बनला आहे. सोमवारी (ता. १२) रात्री धांडे नगर कमानीजवळील पुलावर एक मोठा अपघात थोडक्यात टळला. .वळण घेताना एक चारचाकी कार (एमएच २३ एच ५१२३) पुलाजवळच्या खोल खड्ड्यात कोसळता कोसळता बचावली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला..Chhatrapati Sambhajinagar: रजापूर शिवारात तिहेरी अपघात; पाच जखमी; टायर फुटल्याने वाळूचा हायवा उलटला, नंतर दोन कारची धडक.धांडे नगरजवळील या पुलाला ना संरक्षक कठडे आहेत, ना लोखंडी ग्रील. पुलालगत मोठे खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही..सोमवारच्या घटनेत कार खड्ड्याच्या टोकावर अडकल्याने चालक थोडक्यात बचावला. मात्र, या ‘मौत का कुआ’मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसेंदिवस अपघात वाढत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्म हलण्यास तयार नाही..Premium|China Humanoid Robots : चीनचे ‘रोबो ट्रेनिंग फार्म्स’; मानवी घामातून उभी राहणारी नवी औद्योगिक क्रांती.एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल बीडकर विचारत आहेत. रस्त्याचे काम तत्काळ करून संरक्षक कठडे बसवावेत. अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.