Beed Crime : पाच लाखांच्या खंडणीसाठी बीडमध्ये व्यापाऱ्याचे अपहरण
Kidnapping Case : बीडमध्ये वाहन व्यापाऱ्याचे चौघांनी अपहरण करून त्याच्याकडून पाच लाखांची खंडणी मागितली. मारहाणीच्या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड : वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे चौघांनी पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी संगनमत करून अपहरण केले, तसेच बेदम मारहाण केल्याची घटना गिरामनगर भागात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.