Beed News: ‘झूम ॲप’द्वारे बारावीच्या परीक्षेवर नजर! बीड जिल्ह्यात केंद्रांवर कारवाई सुरू, ‘सीसीटीव्ही’च्या पळवाटांवर पर्याय
Beed Class 12 Exam Zoom Monitoring: बीड जिल्ह्यातील बारावी परीक्षेत १०३ केंद्रांतील ७२२ वर्गखोल्यांमध्ये ‘झूम’च्या माध्यमातून परीक्षा निरीक्षण करण्यात आले. सीसीटीव्ही बसविण्यात काही केंद्रसंचालकांनी टाळाटाळ केली, त्यामुळे ऑनलाइन पर्यायाने पारदर्शकता सुनिश्चित केली गेली.
बीड : बारावी परीक्षेदरम्यान प्रत्येक केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्याची शिक्षण विभागाने सक्ती केल्यानंतरही यातून काही केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांनी पळवाट शोधली. त्यातून गैरप्रकार घडले.