Beed Trader Death Case : व्यापारी मृत्यू प्रकरणी दोघांना गुरुवारपर्यंत कोठडी
Illegal Money lending : कोरोनाकाळात घेतलेले कर्ज परत केल्यानंतरही सावकारांचा छळ सुरूच राहिला. अखेर बीडमधील व्यापाऱ्याने जीवन संपवले. प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यासह दोघांना अटक झाली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बीड : तब्बल दहा टक्के व्याजाने घेतलेले अडीच लाख रुपये कोरोनाकाळात परत केले. तरीही सावकारांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून व्यापारी राम दिलीप फटाले (वय ४२) यांनी रविवारी (ता. सहा) आत्महत्या केली.