Bajrang Sonawane: बीडमधील खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Vilas Ghule killed while trying to save another youth from a deadly assault: रामेश्वर गायकवाड याने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. स्थानिक नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या विलास यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवले.
Political Waves in Beed

Political Waves in Beed

esakal

Updated on

बीड, ता. २२ : एका तरुणाला जीवघेण्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेलचालकाचा चाकू भोसकून खून करण्यात आला. ही घटना केज तालुक्यातील टाकळी फाटा येथे घडली. विलास नवनाथ घुले (वय ३०) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे टाकळी गावात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com