
बीड: किरकोळ कारणावरून शहरात मंगळवारी (ता.२) रात्री तरुणाचा खून झाला. दुचाकीची किल्ली काढून घेतल्याने ती परत दे असे सांगूनही तो देत नसल्याने मित्राने रागाच्या भरात वार करुन हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयित अभिषेक राम गायकवाड यास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.