सासूकडून जावयाचे सतराशे साठ लाड, दुसऱ्या दिवशी पोलिस स्टेशनमध्ये काढली वरात

दिगंबर देशमुख
Wednesday, 17 February 2021

घरात कोणी नसल्याची संधी साधत जावयाने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील सिरसाळा गावात उघडकीस आला

सिरसाळा (बीड): घरात कोणी नसल्याची संधी साधत जावयाने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील सिरसाळा गावात उघडकीस आला. याप्रकरणी सुनीता कांबळे,(सासू)रा.सातेफळ ता.अंबाजोगाई ह. मु. पोलिस काॅलनी सिरसाळा यांच्या फिर्यादीवरून सोमवारी(ता.15) रोजी सिरसाळा पोलिसात घटनेची नोंद झाली.

फिर्यादीची मुलगी सीमा मागील एक वर्षापासून या ठिकाणी राहते. तिचा पती गोपाळ उत्तम कसबे रा.वानटाकळी ता.परळी)हा नेहमी त्यांच्याकडे  येत असतो. गोपाळने आधारकार्ड व ईतर कागदपञे सासरवाडीत ठेवली होती. बुधवारी(ता.१०)सुनीता आणी कुटंबीय नातेवाईकाच्या लग्नासाठी सातेफळला गेले होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मावशीचे निधन, वीस मिनिटांची भेट ठरली...

त्यावेळी गोपाळने सासरे खंडूराव कांबळे यांना फोन केला आणि कागदपञे मागीतली. त्यांनी घरी आल्यावर देतो असे सांगितले परंतू संतापलेल्या गोपाळने घराचे कुलुप तोडून पञ्याच्या पेटीत ठेवलेले त्याचे कागदपञे व रोख रक्कम वीस हजार रूपये चोरून लंपास झाल्याची घटना उघडकीस आली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईजवळ बसून चिमुकले बहीण-भाऊ दिवसभर रडले, बापाच्या...

घरी परतल्यावर सुनीता कांबळे यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर त्यांनी सिरसाळा ठाण्यात फिर्याद दिली.त्यामुळे गोपाळ कसबेवर गुन्हा नोंद करण्यात आला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed crime news theft in law home crime registerd in sirsala police station

Tags
टॉपिकस
Topic Tags: