
Beed Latest News: बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिरूर तालुक्यातील नागऱ्याची वाडी येथे अवघ्या १२ हजार रुपयांच्या वादातून एका तरुणाला घरातून उचलून त्याचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याला लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेची तक्रार दाखल होऊनही आरोपी अजून मोकाट आहेत, असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.