Beed : कोरोना टेस्ट करत आहोत म्हणत टाकला दरोडा; रोकड,दागिने लुटले

दाम्पत्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच सहा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना हातातील काठीने मारहाण करण्यास सुरूवात केली.
crime news
crime newssakalmedia

माजलगाव (जि.बीड) : कोरोना टेस्ट करत आहोत, असे म्हणत शहरापासुन (Majalgaon) जवळच असलेल्या भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत गुरूवारी (ता.दोन) सहा अज्ञात दरोडेखोरांनी घरातील वृद्ध दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून काठीने मारहाण केली व दरोडेखोरांनी घरातील सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा अडीच लाख रूपयांचा ऐवज लूटत पळ काढला. शहरालगतच असलेल्या भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत शेतकरी असलेले लक्ष्मणराव शिंदे व संजीवनी शिंदे हे वृद्ध दाम्पत्य आपल्या तीन विवाहित मुला-सुना नातवंडांसह राहतात. बुधवारी (ता.एक) रात्री अकराच्या दरम्यान मोठा मुलगा राजेश शिंदे घरी उशिरा आले व घराच्या मेन गेटला कुलूप लावून आपल्या पत्नीला घेऊन वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. खालच्या हॉलमध्ये लक्ष्मणराव शिंदे व संजीवनी शिंदे हे झोपेत असताना पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या मेन गेटचे कुलूप तोडत असल्याचा आवाज त्यांना आला. (Crime In Beed)

crime news
परभणी महापालिका निवडणुकीत रासप प्रणित पॅनलची एंट्री : आमदार गुट्टे

दरम्यान सहा अज्ञात दरोडेखोरांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. शिंदे दाम्पत्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच शस्त्राचा धाक दाखवून त्यांना हातातील काठीने मारहाण करण्यास सुरूवात केली. 'चुप बैठो हम यहा कोरोना टेस्ट कर रहे है', असे सांगत घरातील समानाची नासधूस करत कपाट धूंडाळले. यावेळी त्यांना कपाटात ६० हजार रूपये किंमतीची एक सोन्याची साखळी, ४० हजार रूपये किंमतीचे एक सोन्याची अंगठी, दहा ग्रॅम वजनाची वजनाची एक अंगठी, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, दहा ग्रॅम सोन्याचे मनिमंगळसुत्र, ५.५ ग्रॅमचे सोन्याचे वेल व झुंबर, तीन हजार रूपये किमतीचे कुडक, चांदीचे चैन, वाळे, आठ हजार रूपये रोख रक्कम असा एकुण अडीचा लाख रूपयांचा सोन्या-चांदीच्या दागिण्यासह रोख रक्कम पळविल्याची घटना घडली असुन संजवनी लक्ष्मण शिंदे यांच्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा अज्ञात चोरट्यांविरूध्द झाला असुन तपास पोलिस निरीक्षक धनंजय फराटे हे करित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com