
बीड : जो खंडणीत आडवा येईल त्याला आडवे करा. उठ-सूट कोणीही आडवे आले तर आपल्याला भीक मागावी लागेल, हा वाल्मीक कराडचा संदेशच सुदर्शन घुलेला संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. त्यानंतर नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलवर बैठक होऊन अपहरण आणि हत्येचा कट शिजल्याचे दोषारोपपत्रातून समोर आले आहे.