
Beed Latest News: पुणे येथील वैष्णवी हगवणे हिचा छळ झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर असतानाच बीडमध्येही माहेरून एक लाख रुपये आण म्हणत विवाहितेचा तिच्या सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ करून तिला आणि दोन लहान मुलींना रात्रीच्या वेळेस घराबाहेर हाकलल्याची घटना शहरात घडली.
अंजुन आमेर बेग (वय २४, रा. बालेपीर आमराई, बीड) यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती आमेर बेग अजीज बेग, सासू जमीला बेग आणि नणंद गुलनाज इमरान काझी अशी छळ करणाऱ्यांची नावे आहेत.