
परळी विधानसभा मतदारसंघाला दोन मंत्रीपदे मिळणार असून मुंडे-बंधु भगिनी दोघे आज नागपुरात होणाऱ्या मंत्री मंडळाच्या विस्तारात मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
परळी विधानसभा मतदारसंघासाठी आजचा ऐतिहासिक दिवस ठरणार असून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते धनंजय मुंडे सायंकाळी नागपुरात होणाऱ्या मंत्री मंडळाच्या विस्तारात शपथ घेणार आहेत. पंकजा मुंडे यांना शनिवारी (ता.१४) मध्यरात्री पक्षाच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण मंत्रीमंडळात सहभागी होणार असल्याचा फोन केला होता.