बीड जिल्ह्यात वीज अंगावर पडून सख्खे बहीण-भाऊ जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

आई-वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहीण-भावाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मोरवड येथे शुक्रवारी (ता. १२) घडली आहे. गुरुवारी तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची शेतात पेरणी व कापूस लागवड सुरू आहे.

वडवणी (जि. बीड) - आई-वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहीण-भावाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मोरवड येथे शुक्रवारी (ता. १२) घडली आहे. गुरुवारी तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची शेतात पेरणी व कापूस लागवड सुरू आहे. शुक्रवारी मोरवड येथील विष्णू अंडील यांच्या शेतात कापूस लागवड सुरू होती. यामध्ये विष्णू अंडील यांचा मुलगा व मुलगी कामात मदत करत होते.

दुपारी तीन वाजता पाऊस सुरू झाल्याने आई-वडील व हे दोघे बहीणभाऊ निवाऱ्यासाठी झाडाच्या खाली थांबले होते. त्या झाडावर अचानक वीज कोसळल्याने अशोक विष्णू अंडील (वय 17) व पूजा विष्णू अंडील (वय 15) यांच्या होरपळून जागीच मृत्यू झाला. अशोक हा पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता, तर मुलगी पूजा गावातीलच विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होती. मुलगा कोरोनामुळे गावी आला होता; मात्र त्याच्यावर काळाने घाव घातल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Beed district, a brother and sister were electrocuted and killed on the spot