
Beed Floods
sakal
बीड : मुसळधार पावसाने जिल्ह्यात कहर केला. सलग तीन दिवस कोसळलेल्या अतिवृष्टीमुळे पिकेच नव्हे तर जमिनीही वाहून गेल्या असून शंभराहून अधिक जनावरे दगावली. जिल्ह्यातील सुमारे ६ लाख शेतकऱ्यांचे चार लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सात हजार हेक्टर जमीन खरडून गेली आहे.